मराठी भाषा दिवस

आज २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस. आपल्या रोजच्या जगण्यात जरी मराठी कमी झाली असली तरी आजही आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. माझ्या माय मराठी साठी सादर ओळी सादर करीत आहे 


माय मराठी चा दिन असे आज
मराठी संस्कृती ला चढविला साज
गर्व नाही तर असे आम्हाला माज
मराठी बोलायला मग का वाटते लाज 

सोडूनि द्या परभाषेचे जोखड 
घुमू दे आपल्या मराठीचे आसूड 
यऊ दे समोर कुणीही द्वाड 
बोलू आम्ही केवळ मराठी निर्भीड 

0 comments:

Post a Comment