चंद्र आणि तू

चंद्र खूप सुंदर दिसतो, तू हि दिसतेस
लांब असूनही मनात घर करून राहतेस.

तो रोज रात्री दिसतो
तुला मात्र कधीही पाहता येतं
व्हाट्स अँप च्या खिडकीतून
तुझ्या आयुष्यात डोकावता येतं.

चंद्र आमचा, रोज उगवतो
तू मात्र वर्षातून एकदा.
भेटायची केवळ आश्वासने
देतेस तू सदानकदा...

पण काही गोष्टींमध्ये मात्र तूच सरस आहेस
कारण त्याचा कुठे एवढा गोड आवाज आहे
हसणं देखील तुझंच गोड आहे
आणि माझं असणं देखील तुझ्यामुळेच आहे...! 

0 comments:

Post a Comment