तू

गोड गुलाबी थंडीमधली
प्रेमळशी ऊब तू
एकाकी आयुष्यातील
हलकीशी चाहूल तू

कडाडती वीज तू
तलवारीचे तेज तू
आभाळातून बरसणारा
प्रेमाचा वर्षाव तू

मी बेबंद बेफान
समईची ज्योत तू
माझ्या स्वछंद पतंगाची
नाजूक रेशीम तू

शीतल सुंदर अशी
चंद्राची कोर तू
सा पासून नि परी
सुमधुर संगीत तू

मी बेरंग क्षितिज
रंगांची उधळण तू
इंद्रधनू अवतरलीस
घेऊन सप्तरंग तू

मी सत्यवान सावित्री तू
दिले मज जीवनाचे दान तू
घेऊन सप्तपदी मजला
बांधिले सात जन्म तू

कृष्णाची बासरी तू
कपाळीचे मोरपंख तू
वदली जी गीता त्याने
त्या गीतेचे सार तू

आदी तू अंत तू
सरितेहून संथ तू
निर्विकार निष्काम
व्यापली अनंत तू

0 comments:

Post a Comment