तू काही खास होतीस

एक वेडी आस होतीस
फुलांचा सुवास होतीस
तू खरी होतीस की कल्पना
की फक्त माझा भास होतीस

बुडत्याचा आधार होतीस
उमेदीचा ध्यास होतीस
या गुदमरलेल्या जगात
तू माझा श्वास होतीस

निरागस निष्पाप होतीस
अवखळ अन खट्याळ होतीस
इतरांसारखीच तरीही
तू काही खास होतीस

0 comments:

Post a Comment