स्वप्न

स्वप्ने कितीही पहिली तरी होत नाहीत खरी
तू भेटशील ही आशा न केलेलीच बरी
खरीखुरी नसलीस तरी आहेस तू परी
स्वप्नलोकातून कशी काय अवतरशील बरी

तरी माझं मन सारखं करत हट्ट
हातातला तुझा हात धरून ठेवतो तो घट्ट
तुला भेटायचा घेतला आहे त्याने ध्यास
तूच आहेस म्हणतो माझ्या उरातला श्वास

आता काय सांगू मी या वेड्या मनाला ||2||
टिटवी ने का घालायची असते गवसणी आकाशाला
गपगुमान आपलं चार चौघांसारखं जगावं
तिचा फोटो उराशी घेऊन मनसोक्त रडावं

स्वप्न खरी होत नाहीत हेच आजचं वास्तव आहे
एकतर्फी प्रेमाचं दुःख हेच प्राक्तन आहे


0 comments:

Post a Comment